🌟वाशिम शहरातील एका युवकावर स्थानबद्धतेची कारवाई....!


🌟एमपीडीए कायद्याअंतर्गत महिनाभरातील दुसरी तर वर्षातील चौथी कारवाई🌟

फुलचंद भगत

वाशिम (दि.२१ सप्टेंबर २०२३) :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजन कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते. 

   वाशिम शहरातील काळे फैल परिसरात राहणारा २२ वर्षीय युवक नामे अभिषेक उर्फ गोलू पवन खरबाळकर हा काळे फैल परिसरासह शहरात गुंडगिरी करतो. त्याचेविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर  येथे खुनाचा प्रयत्न, अग्नीशस्त्रासह धारदार व घातक शस्त्रे बाळगणे, हत्यारांचा धाक दाखवत खंडणी मागणे, मारामारी करून परिसरात दहशत पसरविणे ई. अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. 

     सदर युवक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्याने घातक शस्त्रासह परिसरात दहशत पसरवित धाक जमविण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यव्यवस्थेस बाधा उत्पन्न न व्हावा यासाठी सदर या युवकावर MPDA अधिनियम, १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) चे कलम ३(२) अन्वये ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली प्रस्ताव पोलीस प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दि.२०.०९.२०२३ रोजी सदर आरोपींविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश मा.जिल्हादंडाधिकारी यांनी पारित केला आहे. सदर युवकास ताब्यात घेऊन त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची हि सप्टेंबर २०२३ या महिन्यातील दुसरी तर वर्षभरातील चौथी कारवाई असून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अश्याप्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जाणार आहेत.

सदर MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते, पो.नि.गजानन धंदर, पो.स्टे.वाशिम शहर व पोउपनि.शब्बीर पठाण, पोलीस अंमलदार गजानन गोटे, अमोल इंगोले, महेश वानखेडे, शुभम चौधरी, सुषमा तोडकर सर्व नेमणूक - स्थानिक गुन्हे शाखा यांनी मेहनत घेतली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या