🌟असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत🌟
परभणी : परभणी जिल्ह्यात आज मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी श्री गणेश स्थापना होणार असून,२८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या उत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-२, सीएल-३ व एफएल-२, एफएल-३(परवाना कक्ष), एफएल, बीआर-२, ताडी अनुज्ञप्ती आज मंगळवारी मद्य विक्रीसाठी संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.
*****
0 टिप्पण्या