🌟‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ चित्रप्रदर्शनीला मंत्री श्री.अतुल सावे यांची भेट....!


🌟मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे🌟

परभणी (दि.१७ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर येथे परभणी शहरातील जिजाऊ आयटीआयच्या वतीने ‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाला भेट देत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 

 आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे, माजी खासदार सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या चित्रप्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे नाव, मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे गृहनिर्माण, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांना जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी सांगितले. 

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. नितीन लोहट, कार्यक्रम समन्वयक सिद्धेश्वर जाधव उपसि्थत होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या