🌟कॉलेज ऑफ कम्युनिटी सायन्स च्या सांस्कृतिक सराव शिबिराला जल्लोषात सुरुवात झाली....!


🌟मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या वतीने भव्य सांस्कृतिक महोत्सव🌟


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असणारे कॉलेज ऑफ कम्युनिटी सायन्स हे महाविद्यालय तसे शैक्षणीक क्षेत्रातील अतिशय नावलोकिक् असणारे अनेक विषयाशी संबंधित असणारे संशोधक विद्यार्थी येथूनच पुढे आले आहेत, त्या सोबतच विद्यार्थांना क्रिडा आणि विशेष करून कला आणि सांस्कृतिक क्षेत्रा मध्ये सुद्धा त्यांच्या अंगी असणाऱ्या प्रतिभेला संधी मिळावी या उद्देशाने विविध युवक महोत्सवात तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो, विद्यापीठा च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात विविध कला प्रकारात दर वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस पारितोषिके पटकावली आहेत,मागील 13 वर्षां पासून या महाविद्यायांमध्ये मी विविध कलेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या वतीने भव्य सांस्कृतिक महोत्सव दिनांक 16 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे त्या निमित्ताने महविध्यालयाचे विध्यार्थी विविध कला प्रकारात सहभागी होणार आहेत,देशभक्ती गीत गायन,नृत्य या कलेचे सादरीकरण करणार आहेत.त्या सांस्कृतिक महोत्सव निमित्त 3 दिवसीय सराव शिबिरात तयारी सुरू आहे,या महाविद्यालयाच्या कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्या डॉ.जया बंगाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची दिमाखात तयारी विध्यार्थी करत आहेत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी या साठी सातत्यपूर्ण सर्वंकष प्रयत्न करत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या