🌟डॉ.सुनंदा रोडगे एक कर्तव्यदक्ष प्राचार्य - सहसंचालक डॉ.रामकृष्ण धायगुडे


🌟कडक शिस्तीच्या प्राचार्य डॉ.सुनंदा रोडगे तितक्याच विद्यार्थीप्रिय गुरु होत असेही सहसंचालक डॉ.धायगुडे 🌟

      डॉ.सुनंदा रोडगे यांनी प्राध्यापक, प्राचार्य,सहसंचालक, शासनाच्या आणि विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर काम करताना आपल्या कुशल प्रशासनातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शिक्षण क्षेत्रात शासकीय अध्यापक महाविद्यालयातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतिमान करत एक गुणात्मक दर्जा आपल्या सहकारी प्राध्यापकांना सोबत घेत निर्माण केला आहे.त्या नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देत.त्यांनी आपल्या शिस्तप्रिय,कुशल प्रशासनातून स्वताःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली.प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आपले कार्यनिपूणतेतून एक अमिट अशी छाप त्यांनी शिक्षण क्षेत्रात उमटवली.महाविद्यालय परिसर स्वच्छतेला प्राधान्य देत उद्याचा भावी शिक्षक सर्वगुणसंपन्न असावा असं प्रशिक्षण त्यांना देण्याकडे त्यांचा आग्रह आणि तसा प्रयत्न असे.कडक शिस्तीच्या प्राचार्य डॉ.सुनंदा रोडगे तितक्याच विद्यार्थीप्रिय गुरु होत,असे मत डॉ.रामकृष्ण धायगुडे,सहसंचालक,उच्च शिक्षण विभाग, नांदेड यांनी व्यक्त केले.

           शासकीय अध्यापक महाविद्यालय परभणीच्या प्राचार्य डॉ.सुनंदा गोपीनाथराव रोडगे ( मोरे ) सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळ्यात अध्यक्षीय समारोपात डॉ.रामकृष्ण धायगुडे बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुनीता सुकंवाड जिल्हा कोषागार अधिकारी ,परभणी.सुयशजी दुसाने प्रशासन अधिकारी ,उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. वसुंधरा बोरगावकर पोलीस निरीक्षक, नांदेड.इंजि.प्रभाकरराव मोरे, सत्कारमूर्ती  प्राचार्य सुनंदा रोडगे,मातोश्री शांताबाई रोडगे, सुरेशराव रोडगे,डॉ.भगिरथ मोरे,सौ.मयूरी मोरे,प्रा.डॉ.पद्मा जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करुन करण्यात आली.प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यातआले.प्राचार्य डॉ.सुनंदा रोडगे यांच्या सेवापूर्ती निमित्त महाविद्यालयाच्या वतीने जेष्ठ प्राध्यापिका डॉ.पद्मा जाधव यांनी  श्री परशुराम मोरे आणि डॉ. सुनंदा रोडगे यांचा सत्कार केला.प्रसंगी मातोश्री शांताबाईं रोडगे,सुरेशराव रोडगे,डॉ.भगीरथ मोरे, डॉ.मयूरी मोरे,अनन्या मोरे,अर्जून मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

       एकूणच माझ्या सेवाकाळात मला माझ्या सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले.त्या मुळेच माझी कारकीर्द अधिक यशस्वी बनली.कर्तव्य पालन करताना माझ्या शिस्तप्रिय स्वभावामुळे काही लोकांना त्रास ही झाला असेल परंतु त्या मागे माझा हेतू शुद्ध होता.पीढी घडविणारा शिक्षक विषय पारंगत असावा,विद्यार्थी हिताला प्राधान्य देत ज्ञानदानाच पवित्र कार्य त्यांचे हातून घडावं ,ही रास्त अपेक्षा ठेवत मी प्राचार्य पदाचा भार सांभाळत पदाला न्याय देण्याचं काम केलं,मी समाधानी असल्याचे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना डॉ.सुनंदा रोडगे यांनी केले.

     प्राचार्य डॉ सुनंदा रोडगे सेवापूर्ती निमित्त आपण सर्वांनी स्वागत करत त्या सेवाकार्यास सन्मानित केले.बालपणा पासूनच जिद्दी असणाऱ्या सुनंदाताईंना शिक्षणा विषयी आवड होती.चांगल शिक्षण घेत त्यांनी आमच्या वडीलांप्रमाण शिस्त सांभाळत शिस्तीत प्रशासन केलं ही सद्गुण साधनेची शिदोरी दिशादर्शक असून आम्हा सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे मत सुरेशबप्पा रोडगे यांनी मांडले.

       प्रशासन करताना प्रशासक आपल्या व्यक्तीगत शैलीनं नियमानुसार सर्वांना सांभाळत न्याय देत असतो यात डॉ.सुनंदा रोडगे यशस्वी प्राचार्य असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी,परभणी सौ. सुनिता सुंकवाड यांनी सांगितले.

     सुनंदा रोडगे मॅडम एक आदर्श प्राचार्य असून त्या शिस्तप्रिय प्रशासनामुळे सर्वदूर ओळखल्या जातात.उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत अप्पर जिल्हाकोषागार अधिकारी श्री नीलकंठ पाचंगे यांनी व्यक्त केले.

        प्रसंगी प्राचार्य डॉ सुनंदा रोडगे यांच्या कार्यावर आधारित प्रा.डॉ.पद्मा जाधव यांचे निवेदन असलेली,अनिकेत डाके सतिश इंजेवाड यांनी तयार केलेले ध्वनिचिञफीत दाखवण्यात आली. पुनम घोबाळे, प्रथमेश कुलकर्णी, देविदास शिंपले,आबणराव पारवे, अनन्या मोरे ,अर्जुन मोरे यांनी आपली मनोगत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली कदम यांनी केले.तर सुमेध मस्के यांनी आभार व्यक्त केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. एस.पी. चव्हाण,कार्यालय अधिक्षक श्रीमती गीता शिनगारे, मुख्य लिपिक श्री अविनाश तामसेकर, लिपिक श्री गोविंद शिंदे, सेवक श्री बडेराव, कवळीकर, सोळंके सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या