🌟परभणीतील विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेतील साक्षी लक्ष्मण काळे या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड...!


🌟साक्षी काळे ओयासिस इंग्लिश स्कुल परभणी या शाळेची विद्यार्थिनी🌟 

परभणी (दि.२२ सप्टेंबर २०२३) - परभणी येथील ओयासिस इंग्लिश स्कुल विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत साक्षी लक्ष्मण काळे या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र यांचे वतीने घेण्यात आलेल्या  विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ मध्ये ओयासिस इंग्लिश स्कूल परभणी येथील साक्षी लक्ष्मण काळे या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दरम्यान, दिनांक २१ रोजी राजे संभाजी तालीम, परभणी येथे पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत साक्षी काळे ही १४ वर्षा खालील ३९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. तिची  उदगीर जि. लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा यशस्वीतेसाठी ओयासिस इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या