🌟घरकुल योजनेत गरीबांची स्वप्नपूर्ती होईल - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे🌟घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन : प्रशासनाला दिल्या सुचना🌟

गंगाखेड ,प्रतिनिधी

गंगाखेड (दि.२४ सप्टेंबर) - घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. हि स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवित आहे. त्यामुळे घरकुल योजनेत गरीबांची स्वप्नपूर्ती होईल, असा विश्वास गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला. आर्थिक उत्पन्न कमी असल्याने अनेकांना स्वतःचे घर बांधता येत नाही. त्यामुळे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना तसेच धनगर व हटकर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. 

त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड, जात व रहिवासी दाखला, एक लाख रूपये पर्यंतचा उत्पन्न दाखला, जागेचा उतारा नमुना नंबर आठ किंवा सात बारा, बँक पासबुक, आधार कार्ड, जॉब कार्ड, मोबाईल नंबर, ग्रामपंचायत ठराव, राहत्या घराचे फोटो, शंभरच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. 

समाजात आजही रोज संकटाचा सामना करणारा, हातावर पोट असणारा वर्ग मोठा आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजना महत्त्वाच्या आहेत. समाजात कुणीही बेघर राहता कामा नये. सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील पात्र समाज बांधवांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी माझ्या कार्यालयातील शासकीय योजना मदत केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

********************************************

🌟घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नाही...!

आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाज घटकांना हक्काचे पक्के घर मिळावे, म्हणून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजना सकारात्मक पाऊल आहे. कारण, घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नाही. तर त्याच्याशी लोकांच्या भावना व आकांक्षा जोडलेल्या असतात, असेही भावनिक मत आ.डॉ.गुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकात मांडले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या