🌟पुर्णा तालुक्यातील चार गावातील सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्रित येऊन काढला भव्य मोर्चा....!

 


🌟या जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील धोत्रा,हिवरा,रेगांव,पांढरी येथील मराठा बांधवांनी सहभाग नोदवला🌟पुर्णा (दि.१८ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यात देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यातील चार गावातील सकल मराठा समाज बांधव एकत्रित येवून पुर्णा तहसिल ते शहरातील शिवतिर्था पर्यंत भव्य जन आक्रोश मोर्चा काढला यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या मोर्चात तालुक्यातील धोत्रा, हिवरा,रेगांव,पांढरी येथील मराठा बांधवांनी सहभाग नोदवला सदरील मोर्चाचे आयोजन आज सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन ही पाठवले  या भव्य जन आक्रोश मोर्चात शेकडो मराठा समाज बांधवांसह बालगोपाळांसह महीलांचाही सहभाग होता.

     मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातच आरक्षण द्यावे,त्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात मराठा समाज बांधवावर दाखल करण्यात आलेले गुन्हे माघारी घ्यावे अश्या मागण्यांघेऊन पूर्णा तालुक्यातील धोत्रा, हिवरा, रेगांव,पांढरी येथील शेकडो मराठा समाज बांधव बालगोपाळ,महीलांसह  सहभाग होता.ग्रामस्थांनी चुडावा ते पूर्णा पर्यंत वाहनातून रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीमध्ये ट्रॅक्टर चा मोठ्या प्रमाणात समावेश होता.यानंतर मोर्चेकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शासनाना विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत दुपारच्या वेळी हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.मोर्चातील महीला व तरुणींनी शासना विरुद्ध आपल्या मागण्यांचे वाचन करुन शासना प्रति रोष व्यक्त करत तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या