🌟परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील किन्होळा फाट्यावर आंतरवाली सराटी घटने विरोधात रास्ता रोको आंदोलन...!


🌟संतप्त आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार मागणी केली🌟

परभणी (दि.०९ सप्टेंबर २०२३) : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ किन्होळा फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार दि.०९ सप्टेंबर रोजी जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

         परभणी ते पाथरी या राष्ट्रीय महामार्गावरील या आंदोलनात किन्होळा, पेडगाव,भोगाव व अन्य खेड्यापाड्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. संतप्त आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार मागणी केली. यावेळी संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या