🌟पुर्णेत मोकाट जनावरांसह गाढवांचा प्रश्न ऐरणीवर : शांतता समितीच्या बैठकीतही मोकाट जनावरांसह गाढवांवार तुफान चर्चा....!

 


🌟शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी उपस्थित केलेली अनेक गंभीर प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच🌟


✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश

पुर्णा (दि.१९ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सन उत्सवांसह सार्वजनिक/धार्मिक कार्यक्रमांना कुठल्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नयें याकरिता मागील काळात घडलेल्या काही अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेसह पोलिस प्रशासन देखील सदैव तत्पर असते याकरिता पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक सामाजिक/धार्मिक कार्यक्रमांसह सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले जाते यावेळी बैल पोळा,श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सना निमित्त पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक प्रदिपजी काकडे यांनी दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,ग्रामीण भागातील पोलिस पाटील,सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी/कार्यकर्ते,व्यापारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी शांतता समितीच्या बैठकीत अनेक बुध्दीजिवी विचारवंतांनी कायदा व सुव्यवस्थेसह सार्वजनिक सन महोत्सव शांततेत कसे साजरे करता येतील त्या दृष्टीने आपआपली मत मांडली तर अनेकांनी शहरातील मोकाट जनावरांसह मोठ्या संख्येने शहरातील सार्वजनिक रस्त्यांसह सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या गाढवांचा गंभीर प्रश्न उपस्थित केला अनेकांनी मोकाट जनावरांसह मोकाट गाढवांमुळे गणेश महोत्सव काळात गणपती पाहण्यासाठी घराबाहेर निघणाऱ्या महिला अबालवृध्दांसह लहान मुलांना देखील या जनावरांपासून धोका होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने तात्काळ जनावरांचा बंदोबस्त करावा अशी देखील मागणी केली एकंदर शांतता समितीची बैठक या मोकाट जनावरांसह गाढवांच्या गंभीर प्रश्नावरच बराच वेळ गाजली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


पुर्णा शहरासह तालुक्यात सार्वजनिक सन महोत्सव शांततेत साजरे व्हावेत कुठल्याही धर्माच्या धार्मिक उत्सवांना गालबोट लागता कामा नयें याकरिता सामाजिक बांधिलकीचे भान जोपासणारे प्रत्येक समाजातील सद्विवेक बुध्दीमत्तेचे लोक सातत्याने प्रयत्नशील असतात मागील इतिहास पाहता शहरासह तालुक्यात ज्या काही अप्रिय घटना घडल्या त्या घटनांना मोकाट जनावरांसह मोकाट गाढवच जवाबदार होती असे काही चित्र रंगवण्याची आवश्यकता नाही पुर्णा शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा जेव्हा जेव्हा गंभीर प्रश्न निर्माण झाला या गंभीर प्रश्नांना शहरासह संपूर्ण तालुक्यात यथेच्छ मद्य ढोसून पडद्या मागील राजकीय गुराख्यांच्या इशाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणारी दोन पायांची सैताडलेली मनुष्यरुपी मोकाट जनावरच कारणीभूत ठरली परंतु या मनुष्यरुपी जनावरांचा बंदोबस्त करणार तरी कोण ? नागरिकांसह शेतकऱ्यांनी अनेक वेळा लेखी स्वरुपात तक्रारी करून देखील प्रशासन मोकाट मुक्या जनावरांसह मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यास तयार नाही तिथे यथेच्छ मद्य ढोसून प्रतिष्ठित नागरिक व्यापाऱ्यांसह सार्वजनिक रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिला शाळकरी विद्यार्थींनींसह शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला वेळोवेळी धुमाकूळ घालून धोका निर्माण करणाऱ्या या सैताडलेल्या मोकाट मद्यपींचा बंदोबस्त प्रशासन खरोखर करणार काय ? शहरासह तालुक्यातील शांतता सुव्यवस्थेला मोकाट मुक्या जनावरांपेक्षा या सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घारलणाऱ्या  मद्यपींचाच जास्त असल्यामुळे प्रथमतः पोलिस प्रशासनाने अश्या    अश्या मोकाट मद्यपींचा अगोदर बंदोबस्त करायला हवा असे मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे.


पुर्णा नगर परिषदेच्या राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीस आवर्जून उपस्थित उपविभागीय अधिकारी (एसडीएम) तथा पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक जिवराज डाफकर,तहसिलदार माधवराव बोथीकर,नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या समक्ष बैठकीस उपस्थित प्रतिष्ठित बुध्दीजिवी नागरिकांनी मोकाट जनावरांस गाढवांचा तसेच शहरातील स्वच्छतेचा सार्वजनिक रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला यानंतर देखील नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही ही निश्चितच अत्यंत निंदणीय बाब म्हणावी लागेल.


पुर्णा पोलिस प्रशासनाचे पो.नि.प्रदिपजी काकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.गावडे हे अधिकारी आपआपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना तहसिल/महसुल प्रशासन,नगर परिषद प्रशासन,महावितरण विभाग प्रामाणिकपणे सहकार्य करतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून आज मंगळवार दि.१९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री गणेशोत्सवाला सुरुवात झाली असतांना देखील शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर पडलेले खड्ड्यांचा प्रश्न,शहरातील स्वच्छतेचा प्रश्न,सार्वजनिक रस्त्यांसह विविध भागातील विद्युत पथ दिव्यांचा प्रश्न,मोकाट जनावरांसह शेकडो मोकाट गाढवांचा प्रश्न कायम जश्यास तसा असल्याचे दिसत आहे मग शांतता समितीत नागरिकांनी केलेल्या सुचना हवेत विरल्या की काय ? असा संतप्त प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे......           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या