🌟मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त : एकता दौड आणि सायकल रॅली उत्साहात संपन्न...!🌟इंदिरा गांधी क्रिडा संकुल ते राजगोपालचारी उद्यानातील हुतात्मा स्मारकापर्यंत एकता दौड आणि सायकल रॅली संपन्न🌟


परभणी (दि.15 सप्टेंबर 2023) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष हे मराठवाड्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी जिल्ह्यात देखील वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज इंदिरा गांधी क्रिडा संकुल ते राजगोपालचारी उद्यानातील हुतात्मा स्मारकापर्यंत एकता दौड आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


या एकता दौडला शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते माधव शेजुळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. तर सायकल रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, जिपचे कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री. उडाणशिवे, जिल्हा क्रिडा अधिकारी शैलेन्द्रसिंग गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.


या एकता दौड आणि सायकल रॅलीला सर्व‍ शासकीय-निमशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, सायकल क्लबचे सदस्य आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या