🌟गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पातील घोटाळ्या प्रकरणातील बाधित शेतकर्यांचे पैसे त्वरीत वितरीत करण्याची प्रमुख मागणी🌟
परभणी (दि.०९ सप्टेंबर २०२३) : परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीचे अनुदान व पिकविमा मंजूर करावा, शेतकर्यांना किमान आठ तास सुरळीत विज पुरवठा करावा तसेच विज कनेक्शन तोडू नये व गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पातील घोटाळ्या प्रकरणातील बाधित शेतकर्यांचे पैसे त्वरीत वितरीत करावेत, या मागणीसाठी शिवेसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता गंगाखेडात शिवसेने (उबाठा) गटाचा विराट मोर्चा निघणार आहे.
बालाजी मंदिर, जूने मराठा मंदिर, भगवती चौक, श्रीराम चौक, अदालत रोड व उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार असून त्या ठिकाणी तालुका प्रशासनास शिवसेनेच्या शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. खासदार जाधव यांनी पुढाकार घेवून आयोजित केलेल्या या मोर्चात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णु मुरकुटे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या