🌟राज्याचे अन्न ओषध प्रशासन मंञी धर्मराव बाबा आत्राम यांना तिसऱ्यांदा माओवाद्यांनी धमकी...!


🌟पहिल्यांदा आमदार झालेल्या धर्मराव आत्राम यांच 1991 मध्ये माओवाद्यांनी अपहरण केल होतं🌟

राज्याचे अन्न ओषध प्रशासन मंञी धर्मराव बाबा आत्राम यांना तिस-यांदा माओवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे.राज्यात सर्वाधिक अतिदुर्गम अतिसंवेदनशील माओवाद्याच्या सर्वाधिक कारवाया असलेल्या अहेरी मतदारसंघाचे धर्मराव बाबा प्रतिनिधित्व करतात १९९१ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेल्या धर्मराव आत्राम यांच माओवाद्यांनी अपहरण केल होतं. तब्बल पंधरा दिवस घनदाट जंगलातून माओवाद्यानी चारशे किलोमीटर धर्मराव आत्राम यांना पायी फिरवल होत. त्यावेळेस माओवाद्याच्या तावडीतून सुरक्षीत बाहेर आलेल्या धर्मराव बाबा आञाम यांना पुन्हा माओवाद्यांकडून धमकी आल्याचे वृत्त आहे त्यावेळेस झालेल्या अपहरणाच्या काय आठवणी आहेत यासंदर्भातला नुकतेच धर्मराव बाबा आत्राम यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट एक्सक्लूसिव संवाद साधला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या