🌟आ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या मुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले...!


🌟रानडुकराच्या हल्ल्यात जखमी होऊन रस्त्यावर कोसळलेल्या मोटारसायकलस्वाराला मदतीचा हात दिल्याने त्याचे प्राण वाचले🌟

 परभणी (दि.२७ सप्टेंबर २०२३) : जिंतूर ते जालना या महामार्गावर अकोली पाटीजवळ रानडुकराच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी होवून रस्त्यावर कोसळलेल्या एका मोटारसायकलस्वारास आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट मदतीचा हात दिल्याने त्या मोटारसायकलस्वाराचे प्राण वाचले.

               आमदार बोर्डीकर या जिंतूरहून आपल्या नियोजित दौर्‍यास निघाल्या तेव्हा अकोली पाटीजवळ एक मोटारसायकलस्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत विव्हळतांना आढळला. परंतु, त्यास ये-जा करणार्‍या कोणीही मदतीचा हात दिला नाही. आमदार सौ. बोर्डीकर यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने या जखमीस उचलून स्वतःच्या गाडीतून जिंतूरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ रवाना केले. बाळासाहेब चढाव (वय 56) असे या जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे कळले असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही हाती आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या