🌟पुर्णा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा युवराजी कारभार : शहरातील नागरिक झेलताय अस्वच्छतेचा मार...!


🌟मयताची अंत्ययात्राही अक्षरशः गटार गंगेतून ?🌟 

पुर्णा (दि.२७ सप्टेंबर २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अकार्यक्षम व निर्लज्ज कारभाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उघड साथ अन् भ्रष्ट एकाधिकारशाही करतेय जनसामान्यांचा विश्वासघात एकंदर अशी भयंकर परिस्थिती पुर्णा शहरात सर्वत्र झाल्याचे झाल्याचे निदर्शनास येत असून शहरात स्वच्छते अभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे गौरी गणपती महोत्सव काळात देखील नाल्यांची स्वच्छता होत नसल्यामुळे नाल्या अक्षरशः तुंबल्याचे दिसत आहे.


पुर्णा नगर परिषदे अंतर्गत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील नाल्यांची स्वच्छता केली जात होती परंतु पूर्णा नगर परिषदेचा पदभार मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी स्विकारल्यानंतर नगर परिषदे अंतर्गत निश्क्रीय व अकार्यक्षम बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील नाल्या नियमित स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे काल मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील गवळी गल्ली येथे अंतयात्रा नेण्यापूर्वी जोरदार पाऊसाला सुरूवात झाली नगर परिषदेने नाल्या नियमित स्वच्छ न केल्यामुळे पाणी नालीतून न वाहता नालीतले गलिच्छ पाणी रस्त्यावर आल्याने अक्षरशः खुर्चीवर तिरडी बनवून प्रेताची पूजा पाठ करण्यात आली व अंतयात्रा नेण्यासाठी  अंत्यविधीला आलेल्याची तारांबळ उडाली शहरातील नाली नियमित स्वच्छ न केल्यामुळे अंतयात्रा नेण्यासाठी महिलांना व पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे नगर परिषदेचे मुख्यधिकारी पौळ व स्वच्छता निरीक्षक यांनी अंतयात्रांना येणाऱ्या नागरिकांसह सरत्या शेवटी ममतांचा देखील सूड उगवण्याचे धोरण अवलंबिले की काय ? असा प्रश्न यावेळी अंत्ययात्रेला आलेल्या नागरिकांमध्ये उपस्थित झाला.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या