🌟संतप्त गौर ग्रामस्थांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा नोंदवला तिव्र निषेध🌟
पुर्णा (दि.०५ सप्टेंबर २०२३) - जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांना पाठींबा म्हणून गावकऱ्यांसह सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने सुरु केलेले आंदोलन उधळून लावण्याच्या दृष्ट हेतूने आंदोलकांसह माता भगिनी व कार्यकर्त्यांवर शुक्रवार दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून जोरदार लाठी हल्ला तसेच गोळीबार केला या घटने अनेक आंदोलकांसह माता भगिनी देखील जखमी झाल्या या घटनेचा तिव्र निषेध नोंदवत आज मंगळवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील गौर गावातील सकल मराठा समाजासह ग्रामस्थांनी तिव्र निषेध नोंदवत राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील गौर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला.
यावेळी गौर ग्रामस्थानी राज्य शासनाच्या काढलेल्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत तिरडीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावून ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा संपूर्ण गावात फिरवली यावेळी गौर ग्रामस्थांसह सकल मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्र सरकारणे मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे,गृहमंत्री फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीणामा द्यावा अशी मागणी केली यावेळी राज्यातील मराठा आमदार खासदार यांना श्रध्दांजली देखील वाहण्यात आली यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या