🌟वाशिम शहर येथे कलम ३९४,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता🌟
वाशिम :- दिनांक १६/०९/२०२३ रोजी फिर्यादी मोहम्मद जिशान मोहम्मद सलाम हा हिंगोली रोडवरील पुलाखालून माहूरवेशकडे जात असतांना रात्री १०.०० वा. दरम्यान एका मोटार सायकलवर राहूल प्रेम धबाले, रा. वाशिम व त्याचे दोन अनोळखी साथीदार आले.
त्यापैकी राहूल प्रेम धबाले याने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार करून त्याच्या खिश्यामधून ४,०००/- रू. जबरदस्तीने हिसकावून नेले होते. त्यानंतर फिर्यादी हा आरोपींच्या भितीने घटनास्थळावरून पळून गेला व जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम येथे उपचारकामी दाखल झाला. पोलीसांनी फिर्यादीचे जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे नोंदविलेल्या बयानावरून पो.स्टे. वाशिम शहर येथे कलम ३९४,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात मिळालेल्या माहितीवरून दिनांक १८/०९/२०२३ रोजी इसम नामे राहूल प्रेम धबाले, रा. शुक्रवारपेठ, घोडबाभूळ चौक, वाशिम यास पंचशिल नगर येथून ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली या प्रकरणी त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी २६००/-रू. जप्त करण्यात आले आहेत.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री. सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री गजानन धंदर यांचे नेतृत्वाखाली डी.बी.पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार लालमणी श्रीवास्तव,रामकृष्ण नागरे, पोलीस अंमलदार उमेश चव्हाण, संदीप दुतोंडे, राहूल चव्हाण, महादेव भिमटे यांनी केली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या