🌟परभणी आज रात्री मुक्काम उद्या दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहन करणार🌟
परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्तिमसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी आज सायंकाळी ७ वाजता परभणी येथे येत असून, रात्री ते येथे मुक्काम करतील.
राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्या रविवारी, सकाळी ९ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय ध्वजरोहण होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तत्पूर्वी उद्या रविवारी सकाळी ८.४० वाजता ते शासकीय विश्रामगृह येथून राजगोपालचारी उद्यानाकडे प्रयाण करतील. त्यांचे सकाळी ८.४५ वाजता राजगोपालचारी उद्यान येथे आगमन होईल. श्री. सावे हे सकाळी ८.५० वाजता स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल. सकाळी ९.०५ वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा घेणे त्यानंतर सकाळी ९.१० वाजता मंत्री श्री. सावे यांचे भाषण होईल. नंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांच्या वीरपत्नी, वारस, वीरमाता व उपस्थितांची भेट घेतील. त्यानंतर सोईने वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
*****
0 टिप्पण्या