🌟जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी घटनेचा सुहागण येथील ग्रामस्थांनी केला तिव्र निषेध🌟
पुर्णा (दि.०८ सप्टेंबर २०२३) - सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवेली येथे झालेल्या गोळीबारा घटनेच्या निषेधार्थ मागील सात दिवसांपासुन मराठवाडा धगधगत आहे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे जरागे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असताना तेथील जिल्हा प्रशासनाने आंदोलन कर्त्यांवर गोळीबार केला ही घटना दुर्दैवी असून या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 07 सप्टेंबर 2023 रोजी गावकऱ्यांचा वतीने तहसीलदार माधवराव भोसेकर यांना निवेदन देण्यात आले व पाठिंबा दर्शविण्यात आला तसेच लाठी हला व गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे हैदराबाद राज्यातील 1960 चा ओबीसीचा दर्जा बहाल करावा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण योगेश नारायण भोसले सुंदराची प्रभू भोसले परशुराम मारुती भोसले यांचे दिनांक 8 सप्टेंबर 2023 पासून सकाळी 9 वाजता आमरन उपोषणाला सुहागन येथे मारुती मंदिराजवळ बसणार आहेत
0 टिप्पण्या