🌟सामाजिक बांधिलकी जपणार सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व नामदेवराव राजभोज....!


🌟नामदेराव राजभोज यांचा समस्त जीवन आणि कार्य समस्त मानव जाती समोर आदर्शवत अशा प्रकारच🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - श्रीकांत हिवाळे पुर्णा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक. पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जिंतूर फर्टीलायझर कारखान्याचे माजी संचालक पूर्णा सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी संचालक गौर येथील सोमेश्वर शिक्षण संस्था संचलित सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून गौर तालुका पूर्णा सुपुत्र व परभणी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामधील सामाजिक बांधिलकी जपणार सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून परभणी जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे आदरणीय नामदेव भिवाजी राजभोज यांचा समस्त जीवन आणि कार्य समस्त मानव जाती समोर आदर्शवत अशा प्रकारच आहे.

महामानव तथागत भगवान बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा कार्याचा प्रभाव असणारे आणि तो विचार कृतीत आणून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सहकार क्षेत्रामध्ये शेतकरी कष्टकरी समाजामधील शोषित पीडित वंचित सर्व समाजातील समाज बांधवांची सेवा सहकार क्षेत्रामधील पदाच्या माध्यमातून त्यांनी केली.

ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला आहे त्या समाजाच्या प्रति माझ काही देणं आहे त्या समाजाच्या उद्धारासाठी आपण काम केलं पाहिजे या  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसिद्ध वचनासी बांधिलकी ठेवून परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्णा सहकारी साखर कारखाना सोमेश्वर शिक्षण संस्था व इतर अनेक ठिकाणी आपल्या ओळखीच्या माध्यमातून शेकडो सुशिक्षित उच्चशिक्षित तरुणांना त्यांनी नोकऱ्या लावण्याचे काम निस्वार्थीपणे केले नोकरी लावणाऱ्या प्रत्येक तरुणास त्यांनी सदाचार नीतिमत्ता चारित्र्य व कर्तव्य निष्ठेचे धडे दिले त्यामधून त्यांच्या हातून नोकरी लागलेले शेकडो जन अतिशय सन्मानान प्रतिस्टेन नोकरी करत आहे. त्यापैकी बरेच जण सेवानिवृत्त ही होत आहेत.

त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाला आदरणीय राजभोज साहेब कपडे रुपी भेट देऊन सपत्नीक उपस्थिती लावतात. यावरून त्यांची त्या कर्मचारी विषयी सद्भभावना लक्षात येते महामानव तथागत भगवान बुद्धांची मंगल मैत्रीची भावना त्यांच्या रोमा रोमा मध्ये जाणवते त्यांच्या भेटीच्या वेळी अनौपचारिक चर्चेच्या वेळी या बाबीची सुखद अनुभूती येते सर्व जाती धर्मामध्ये गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत त्यांच्याविषयी नितांत आदर राची भावना आहे आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार  यांना ते आधार वडा प्रमाणे आहे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदी असताना अनेकांच्या मुली बळीच्या लग्नासाठी आपल्या स्वतःच्या कमांडर जीप मधून आपल्या कोट्यातील साखर त्यांनी त्या कुटुंबीयांना दिली.

याबाबत भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष  एम यु खंदारे यांनी त्यांच्या सुकन्या सुनंदाताई यांच्या लग्नाच्या वेळी राजभोज साहेबांनी साखर स्वतःच्या गाडीमधून घरपोच दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असताना अनेक गरजवंत शेतकऱ्यांना त्यांनी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली.सुरवाडी चे सधन शेतकरी दिवंगत रामचंद्र वाटोडे यांनी पूर्णा शहरांमध्ये घराचे मोठे बांधकाम हाती घेतले होते त्यांना पैशाची निकड होती राजभोज साहेबांनी विना विलंब कर्ज उपलब्ध करून दिले त्यामुळे त्यांचे बांधकाम ते करू शकले. दिवंगत रामचंद्र वाटोडे बाबा राजभोस साहेबांचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असत.

पूर्णा शहरांमध्ये कुठं मागासवर्गीयांसाठी गृहनिर्माण संस्था असावी यासाठी त्यांचे सहकार क्षेत्रातील परममित्र पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आदरणीय उत्तमरावजी कदम यांच्याशी विचार विनिमय करून तक्षशिला मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. त्यासाठी पाच एकर जमीन खरेदी केली मागील वर्षामध्ये ही गृहनिर्माण संस्था चालविण्याची जबाबदारी त्यांनी अखिल भारतीय भिकू संघाचे महासचिव भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपवली.या जागेवर सामान्य माणसासाठी घर उपलब्ध झाली पाहिजे हा त्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश होता.

सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्ह्यामधील उच्च पदस्थ अधिकारी राजकारणातील समाजकारणातील पदाधिकारी यांच्या सोबत त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले. तत्कालीन डी वाय एस पी कुमार शिंदे साहेब गटविकास अधिकारी हिवाळे साहेब मुख्य कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग काकडे साहेब आदी अनेक अधिकाऱ्यासोबत मंगल मैत्रीचे संबंध त्यांनी जोपासले आजही ते तशा प्रकारचे आहेत गौर त्यांची जन्मभूमी गावामधील सर्व जाती धर्म पंथाचे लोक त्यांना आदरस्थानी मानतात. गावाच्या विकास कामांमध्ये सर्वांगीण प्रगतीमध्ये त्यांचं मोलाचे योगदान आहे.पूर्णा शहराच्या आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे श्रद्धा संपन्न विश्वासू उपासक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. 

सर्व प्रकारच्या विकारापासून व्यसनापासून कोसो दूर असलेले आदरणीय राजभोज साहेब यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील निरपेक्ष योगदानाबद्दल तथागत मित्र मंडळ पूर्णा च्या वतीने पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व पूज्य भदंत पै य्या वंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार व मानपत्र देऊन दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पूर्णा या ठिकाणी दुपारी एक वाजता त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.आदरणीय नामदेवराव राजभोज साहेब यांना सन्मानपूर्वक बहाल होणारया समाजभूषण पुरस्काराबद्दल हार्दिक शुभेच्छा मंगल कामना...!

शुभेच्छुक

✍🏻श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा जिल्हा परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या