🌟परभणी जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मॅरेथॉन.....!


🌟जिल्ह्यात प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पीएम रन फॉर स्कील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन🌟

परभणी (दि.१३ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी रविवारी (दि.17) सकाळी 7:30 वाजता प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पीएम रन फॉर स्कील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेणा-या पुरुष व महिला गटात प्रथम, द्वितीय व तृत्तीय येणा-या स्पर्धकास पारितोषिक तसेच सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

तरी जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील तसेच इतर आस्थापना, जनता, प्रशिक्षणार्थी वकर्मचाऱ्यांनी स्पर्धेमध्ये जास्तीतजास्त सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य रमाकांत उनावणे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या