🌟हिंदू सनातन धर्मा विरोधात विषारी गरळ ओकणाऱ्या उदयनिधी स्टॅलीन व ए.राजा यांच्या पुतळ्यांचे भाजपाने केले दहन...!


🌟भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र ठाकरे व शहर अध्यक्ष श्याम खोडे यांच्या उपस्थितीत पुतळ्यांचे दहन🌟


फुलचंद भगत

वाशिम/मंगरूळपीर :-तामिळनाडु चे मंत्री उदयनिधी स्टॅलीन व द्रमुक खासदार ए. राजा यांनी हिंदू सनातन धर्मा विरुद्ध अपमानासद वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा उद्रेक होऊन मंगरूळपीर येथे भारतीय जनता पक्षाव्दारे उदयनधी स्टॅलीन व ए.राजा च्या प्रतिमांना जोडे - चपला मारण्यात आल्या तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.


भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र ठाकरे व शहर अध्यक्ष श्याम खोडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देउन शेकडो भाजपा पदाधीकारी व हिंदू धर्मप्रेमी व्यक्तींनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला, या प्रसंगी 'भारत माता की जय', 'जय श्रीराम', वंदे मातरम' 'स्टॅलीन मुर्दाबाद', 'ए. राजा मुर्दाबाद' इत्यादी नारे देण्यात आले. या आंदोलनात पुरुषोत्तम चितलांगे, सुनिल मालपाणी, सतिश हिवरकर, डॉ. दिलीप रत्नपारखी, प्रा. विरेंद्र ठाकुर, अभिषेक दंडे, ., गोपाल खोडके, महादेव विश्वकर्मा, उल्हास राठोड,मुकेश शिंदे, अनिल भुसारे, सुनिल राठोड, गजेंद्र बजाज, गजानन मानेकर, सतिश राठी, नरेश ठाकुर, बाळासाहेब हवा, युवराज पवार, सचिन पवार, शंकर थोरात, सुमित मुंधरे, रुतीक कनोजीया, प्रशांत तळेकर, गोपाल वर्मा, रामा कुराडे, गणेश मठे, उमेश श्रृंगारे, गोलू जाधव, कपील पवार, संदिप इंगळे, भानुदास टेकाडे, प्रशांत बनसोड, नंदकिशोर भुजाडे, गजानन धनवे इत्यादीसह शेकडो हिंदूत्ववादी उपस्थीत होते.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या