🌟पाथरी तालुक्यात शासनाची तिरडी काढत कान्सुरकरांचे जोडे मारो आंदोलन....!


🌟मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तिरडी काढत गोदावरी नदी काठी अंत्यसंस्कार करत दिवसभर उपोषण आंदोलन केले🌟


प्रतिनिधी

पाथरी (दि.११ सप्टेंबर २०२३) :- आतरवली सराटी येथे मराठा आरक्षणा साठी लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलना वेळी पोलीसांनी केलेल्या बळाच्या वापरात महिला,वयस्क,लहान मुले जखमी झाल्याच्या निषेधार्थ आता तालुक्यात गावा गावात तिव्र आंदोलने होत आहेत. रविवारी कान्सुर येथे शासन कर्त्यांच्या फोटोला लहानग्यांनी जोडे मारो आंदोलन करत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तिरडी काढत गोदावरी नदी काठी अंत्यसंस्कार करत दिवसभर उपोषण आंदोलन केले.


मनोज जरांगे पाटलांना पाठबळ देण्या साठी गावा गावात आंदोलने सुरु आहेत. रविवार १० सप्टेबर रोजी कान्सुर येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारका जवळ गावातील लहान,थोर,महिला,पुरुष एकत्र येत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत शासनाच्या विरधात घोषणा बाजी करत शासन कर्त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांची तिरडी काढत गोदापात्रा किनारी अंत्यसंस्कार ही केले या नंतर येथील सभागृहात सकल मराठा समाच्या वतीने उपोषण करण्यात आले. तुरा येथे ही गावात पक्षीय नेत्यांना गाव बंदीचा सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेत ग्राम सभेत ठाराव मंजुर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या