🌟नांदेड लातूर विमानतळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा...!

 


🌟महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने तातडीने या विमानतळांचा ताबा घ्यावा असे स्पष्ट निर्देश🌟

परभणी (दि.२७ सप्टेंबर २०२३) : गेल्या काही वर्षांपासून खाजगी कंपन्यांमुळे रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने राज्यातील त्या पाचही विमानतळाचा ताबा घ्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने मराठवाड्यातील नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्हास्थानची विमानतळे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

           विमानतळाचे सक्षमीकरण व्हावे, या दृष्टीने पाचही विमानतळे खाजगी कंपन्यांना भाडेपट्ट्यांनी बहाल करण्यात आली होती. परंतु, गेल्या चौदा वर्षात या ठिकाणी विमानसेवा सुरळीत होवू शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने तातडीने या विमानतळांचा ताबा घ्यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी मुंबईत आयोजित केलेल्या एका बैठकीतून दिले. त्यामुळे एमआयडीसीने विकसित केलेल्या या विमानतळारील उर्वरीत कामे पूर्ण होवून लवकरात लवकर विमानसेवा सुरळीत होईल, असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या