🌟गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंच्या विकासात्मक कार्याने प्रभावित होऊन युवा सेना पदाधिकाऱ्यांचा मित्र मंडळात प्रवेश...!


🌟कामाच्या आणि नेतृत्वाच्या बळावर लोक आपल्याकडे आकर्षित होतात ही सुखावणारी गोष्ट - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या विकासात्मक कामाने प्रभावित होऊन युवा सेनेच्या काही प्रमुख पदधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मित्र मंडळात प्रवेश केला. 


त्यामध्ये व युवा ब्रिगेड जिल्हाप्रमुख संदीप राठोड, सदस्य महेश पुरनाळे, संजय राठोड, सुनील राठोड, कैलास रबदडे, दीपक मस्के, प्रकाश पौळ, नितीन डहाळे, सुशील वाघमारे, अक्षय कुरूडे, विक्रम ठाकुर, केशव चव्हाण, भारत राठोड, राम चव्हाण, सचिन राठोड, कृष्णा चव्हाण, केशव चव्हाण, अंकुश राठोड आणि अनिल चव्हाण यांचा समावेश आहे.

कामाच्या आणि नेतृत्वाच्या बळावर लोक आपल्याकडे आकर्षित होतात, हि सुखावणारी गोष्ट असते. खास करून जेव्हा युवा शक्ती सोबत‌ येते, तेव्हा तुम्ही योग्य वाटेवर असल्याची ती प्रचिती असते, नेमका हाच अनुभव या प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने आला आहे, असे कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब बोलताना म्हणाले. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, शहर अध्यक्ष ॲड.अकबर सय्यद, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, कार्याध्यक्ष इक्बाल चाऊस, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख, पत्रकार पिराजी कांबळे, राजेश राठोड, लक्ष्मीबाई आडे, गोविंद मुंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या