🌟वडीलांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप जयप्रकाश वाघमारे यांचा स्तुत्य उपक्रम...!


🌟अशा दातृत्व भावनेतूनच माणसाचं मोठेपण सिद्ध होत -  राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे

नांदेड , प्रतिनिधी 

नांदेड (दि.२४ सप्टेंबर)जुन्या रूढी परंपरा याला फाटा देऊन आणि पैशाचा अपव्यय टाळून आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गेल्या बारा वर्षापासून शैक्षणिक साहित्याचे वाटप करत दातृत्वाच्या भावनेने आपल्या वडिलांच्या स्मृती जागृत करणारे जयप्रकाश वाघमारे आणि उषा वाघमारे गुंटूरकर यांनी दातृत्व भावनेचा आदर केला आहे.अशा दातृत्व भावनेतूनच माणसाचं मोठेपण सिद्ध होते.असे प्रतिपादन साहित्यिक तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी केले..जयप्रकाश वाघमारे यांचे वडील स्वर्गीय चुडामन वाघमारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दगडगाव ता.लोहा येथील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन वही, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी शिवा कांबळे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अशोक राऊत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून 'लसाकम'चे जिल्हाध्यक्ष विजय रणखांब, सामाजिक कार्यकर्ते एन.जी.पोतरे, साहित्यिक शिक्षक उद्धव मुळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी शाळेच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक संयोजक उषाताई वाघमारे गुंटूरकर यांनी केले. पुढे बोलताना शिवा कांबळे म्हणाले की आज समाजात असंख्य लोक गर्भ श्रीमंत आहेत. परंतु काही मोजक्याच दातृत्वत्वान व्यक्तीकडेच समाजातील सामान्य माणसाला काही तरी देण्याची दातृत्वाची भावना असते. त्याच भावनेने गेली बारा वर्षे जयप्रकाश वाघमारे आणि उषाताई वाघमारे यांनी हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी विजय रणखांब,उद्धव मुळे,एन.जी.पोतरे यांनी ही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कैलासे यांनी केले तर आभार भगवान सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या