🌟वाशिम जिल्ह्यातील मौजे नागठाणा येथे वंचित बहुजन आघाडीची ग्रामशाखा स्थापन...!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सदस्या मा किरणताई गिर्हे ह्या होत्या🌟 


फुलचंद भगत

वाशिम:- दि २५/०९/२०२३ रोजी सायंकाळी मौजे नागठाणा ता जि वाशिम येथे वंचित बहुजन आघाडीची ग्रामशाखा स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रदेश सदस्या मा किरणताई गिर्हे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे,  जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हा सचिव वसंता हिवराळे, वाशिम तालुका अध्यक्ष नारायण खोडके, ता महासचिव संजय पडघाण, राहुल मैनकर, सर्कल महासचिव पडघाण हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला वंचित बहुजन आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या नंतर मैदानामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला डॉ सिद्धार्थ देवळे, किरणताई गिर्हे, सोनाजी इंगळे, नारायण खोडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ सिद्धार्थ देवळे यांनी येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी तथा श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर हेच सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मजबूत करून सत्तेवर बसवा असे आवाहन केले. किरणताई गिर्हे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व समावेशक विचारसरणी असून येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल यात शंकाच नाही. त्यामुळे तळागाळातील obc व गरीब मराठा यांच्या सहित छोटे छोटे obc घटक जुळत असून श्रध्येय ऍड बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. 


याचाच फायदा इतर सर्वसामान्यांनी घेऊन येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, विधानसभा , लोकसभा निवडणुकीत स्वतः सहभागी होऊन सत्ता आपल्या हाती घ्यावी असे आवाहन केले. तसेच यावेळी पाउस सुरू असून सुद्धा येथील कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला वर्ग एवढ्या  उत्साहत व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.   सोनाजी इंगळे पुढे बोलतांना म्हणाले की, तळागाळातील सर्वसामान्यांना सत्तेत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर बसवू शकतात. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यात गेल्या 30 वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेमध्ये आहेत. जर आपल्याला वाशिम जिल्ह्यात सत्ता हस्तगत करायची असेल तर आपल्याला अकोला पॅटर्न राबवावे लागेल. म्हणून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणून येणाऱ्या विधानसभेमध्ये डॉ सिद्धार्थ देवळे यांना आमदार करून पाठवण्यासाठी आत्तापासूनच कामाला सुरुवात केली त्याबद्दल तालुका उपाध्यक्ष केशवराव उचित व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष केशवराव उचित, कल्पनाताई उचित, ग्रा सद्स्य अनिल उचित, ग्रामपंचायत सदस्य जयाताई उचित, आदित्य के उचित शाखा अध्यक्ष

संदिप प्र. उचित शाखा उपाध्यक्ष

मदन वि. भगत

सुदेश मा. उचित कोषाध्यक्ष पांडुरंग स. खोलगडे सह. कोषाध्यक्ष राहुल भ. हनवते शाखा महासचिव संदिप सं. उचित शाखा सचिव गजानन वि. भालेराव सह सचिव आयु. संघपाल सु. उचित, आयु. राहुल बा, उचित, आयु. विकास ज्ञा. कांबळे, आयु, संदिप य. धाबे,

आयु. अमोल ग. उचित, आयु. हंसराज वि. उचित, आयु. राहुल प्र. उचित, आयु. शांतनु भि. उचित, आयु. आकाश अ. उचित, आयु. गजानन शा. उचित, आयु. सुनिल र उचित, आयु. राजेश कि. उचित, आयु. सचिन स. उचित, आयु. मिलींग मो. उचित, आयु. विजय मा. उचित, आयु. अरुण भ. उचित, आयु. उमेश सु उचित, आयु. सुधिर म उचित, आयु. सुधिर सि. उचित, आयु. अक्षय रा. उचित, आयु. उत्तम शि. उचित, आयु. गौतम तु, उचित, आयु. कपिल रा. उचित, आयु. माधव के. उचित, आयु. विनोद डि. उचित, आयु. गजानन गो. उचित, आयु. रमेश मा. उचित, आयु. मनोहर मा. उचित पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या