🌟शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस परिषदेस उपस्थित राहण्याचे केले आवाहन🌟
🌟शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी रस्त्यावर उतरावे लागेल - किशोर ढगे
पुर्णा (दि.२७ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव, कातनेश्वर, आहेरवाडी, येथील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या, ऊस,सोयाबीन,कापूस, परिषदेत उपस्थित राहावे असे आवाहन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी परिषदेच्या प्रचारानिमित्त बैठकीत व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दुसरी ऊस, सोयाबीन,कापूस, परिषद ताडकळस येथे १० ऑक्टोबर मंगळवार रोजी पार पडणार आहे या परिषदेस मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.खा. राजू शेट्टी मा.प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे गुरुजी मा.महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ॶॅड.सौ.रसिकाताई ढगे स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष मा. दामू अण्णा इंगोले यांची उपस्थिती लागणार आहे
यावेळी त्यांनी आजच्या घडीला शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झाली असून दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करीत आहेत आता शेतकऱ्यांनी कोणत्याही पुढाऱ्याच्या आमदाराच्या खासदाराच्या मागे न लागता स्वतःसाठी स्वतःच संघर्ष करावा लागणार आहे आजच्या घडीला शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात आला की शेतीमालाचे भाव कमी होतात शेतकऱ्याला तर विकण्या शिवाय पर्याय नसतो यामध्ये व्यापारी दलाल मात्र मालामाल होतात शेतकरी मात्र कंगाल होऊन त्याला आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही हे चित्र कुठेतरी बदलण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या पोरांनी लढले पाहिजे येणाऱ्या हंगामातील उसाला ३३०० रुपये प्रति टन भाव मिळालाच पाहिजे ऊस वाहतुकीचा दर ५० टक्के वाढीव मिळालाच पाहिजे सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ९००० रुपये स्थिर ठेवलाच पाहिजे तसेच पिक विमा अग्रीम मधून वगळलेल्या कापसाला २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर झाला पाहिजे या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी या परिषदेस गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी व्यक्त केले
या प्रचार बैठकीत बाळासाहेब घाटोळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले प्रा. रामेश्वर आवरगंड रामप्रसाद गमे उद्धवराव जवंजाळ मयूर वाघमारे यांची उपस्थित होते
यानिमित्त सोपान बोबडे कृष्णा बोबडे माधव बोबडे शिवाजी बोबडे गजानन वाघमारे शिवाजी चापके भारत चापके गजानन चापके सुभाष मोरे भगवान मोरे पुंडलिक मोरे छगनराव मोरे उद्धवराव मोरे यांच्यासह माटेगाव, आहेरवाडी, कातनेश्वर, येथील शेकडो शेतकरी बांधवांनी या परिषदेस उपस्थित राहून उसाला ३३०० रुपये भाव घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा एकमताने ठराव पारित केला हजारो शेतकऱ्यांनी परिषदेस जाण्याचा संकल्प केला...
0 टिप्पण्या