🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच चैत्य स्तुप स्मारक उभारण्याचं ऐतिहासिक कार्य यशवंत आंबेडकरांनी केले.....!


🌟सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मभूमी महु ते मुंबई अशा प्रकारची रॅली काढली होती🌟


पुर्णा : पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृति दिनानिमित्त बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर सकाळी दहा वाजता अभिवादन सभेचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो  भदंत पाय्यावांश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात  आले होते.


याप्रसंगी प्रमुख उपस्थिती पूर्णा शहरातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ दत्तात्रेय वाघमारे व गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदंड एम यु खंदारे बाबाराव वाघमारे ज्ञानोबा जोंधळे मुंजाजी गायकवाड बुद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अमृत कऱ्हाळे उमेश बारहाटे अतुल गवळी किशोर ढाकर गे बुद्ध विहार समितीचे टी झेड कांबळे दिलीप गायकवाड इंजिनियर पीजी रणवीर पत्रकार विजय बगाटे साहेबराव सोनवणे गौतम भोळे राम भालेराव मुकुंद पाटील आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकताना सांगितले दादर मुंबई या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक चैत्यभूमी निर्माण करण्यासाठी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मभूमी महु ते मुंबई अशा प्रकारची रॅली काढली होती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेकडून निधी गोळा करून मुंबई दादर या ठिकाणी चैत्य स्तूपाची निर्मिती केली.भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने बुद्ध धम्म प्रचार प्रसाराचे कार्य मोठ्या  प्रमाणावर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  राम भालेराव सूरज जोंधळे सोनू काळे  व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या