🌟पन आपनं सर्वानी त्या पदवीची व जनतेच्या अपेक्षांची लाज तरी राखून ठेवली आहे का ?🌟
पत्रकार मित्रांनो,
आपनं सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या विविध वृत्तपत्रात व न्यूज चैनल मध्ये अनेक वर्षा पासून ईमाने ईतबार काम केले असेल/ करत आहोत. यामुळे आपल्याला लोकशाहिचा चौथा स्तंभ (भारतरत्न सारखीच समझा) अशी मानाची पदवी सुद्धा जनतेकड़ून बहाल आहे आणि जनता तशी न्यायाची आपल्याकड़ून अपेक्षा सुद्धा करते (कदाचित करत होते अशे लिहिने वागवे ठरणार नाहीच) पन आपनं सर्वानी त्या पदवीची व जनतेच्या अपेक्षांची लाज तरी राखून ठेवली आहे का ?
पत्रकारिता हेच आपले एकच कर्तव्य आणि हाच आपला एकमात्र धर्म व क्षेत्र अशे विचार व ध्येय कायम न ठेवता आज आपन विविध पद, संघ, संघटना, पक्ष, दल ,पार्टी यामध्ये स्वतालाच विभाजून घेतले आहे आता ति लहानपनची एक लकड़ी और लकड़ी का बंडल वाली कथा आपल्यावर मुळीच शोभा देत नाही , वाटल्यास आपल्या तोड़ून त्या कथेचे नाव घेतल्यास त्या कथेचाच घोर अपमान होईल अशी दुरावस्था आली नाही तर स्वताच्या स्वार्थापोटी ति दुरावस्था आपनं सर्वांनीच आंगावर ओढुन घेतली आहे म्हणुन कुणी स्वताला सोशल मीडियाच्या गुरु समझनारा एक मास्तर भारताची मीडिया पूर्णता वीकली गेली आहे अशे छातीठोक बोलून पत्रकार व पत्रकारिताची नागवी ढिंड काढतो तर नुकताच
एक माजी मंत्री असलेला पक्ष नेता नेगेटिव बातम्या न येण्यासाठी पत्रकाराना चायपानी साठी बोलवा अशे आव्हान करून पत्रकारितेला जनुकाही गंगा जमुना स्तराचा लेवल देवू पाहतो, त्यांचा चायपानी आपनं सुद्धा चांगलाच समझतो, कारण आपनं तो अगोदरच घेवून असतो.
अशे अनेक उदाहरण आताही कायम असून यांना प्रतित्युत्तर म्हणून आपल्यापैकी एखाद्या पत्रकार किंवा पत्रकार संघटनेने विरोध, आक्षेप, तक्रार, निवेदन, एफआईआर, आंदोलन, उपोषण, रास्ताजाम केल्याचे किंवा त्याविषयी आपल्याच वृत्तपत्रात व चैनल वर आपनं त्याना जाब तरी विचारला असेल , अशी एकही बातमी मि आजवर कधी न एकली, वाचली, पाहली, न आढळली
आपनं पत्रकार, उपसंपादक , संपादक , प्रतिनिधी असाला / आहात , हे तुमच्या कुटुंबियाना , नातेवाईकाना, मित्र मंडलीना माहितच आहे आणि हैं वरील बातमी त्यानां वाचायला दाखवा आणि मग तुमच्यासाठी त्यांच्या नजरेत तुमची लायकी व किंमत बघा कारण बाहेर आपनं स्वताच आपले आपले रेट फिक्स केले आहेत,काही दिवसात आपल्या घराबाहेर असा रेटबोर्ड सुद्धा लागेलच वास्तविक जर निरखून व विचार करून पाहले तर हा रेट आपल्या व आपल्या कुटुंबातिल आई , बाबा, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिन व अन्य यांच्या मान, सन्मान, आत्मसंमानचा , आईची कोख व बापाची परवरिशचा रेट असतो आणि त्यानां हे लागू पन आहे कारण ते आपल्याच पत्रकारिताची कमाई खातात.
वाईट मानू नका, पन काही दिवसात शाळा, कॉलेज , समाजात जाणाऱ्या आपल्या मुला मुलीच्यां मस्तकांवर हाच समाज *मेरा बाप पत्रकार हैं अशे लाल अक्षरात कोरणार आहेच. आणि तशी वेळ सुद्धा जवळच आलेली आहे कारण अगर रिश्वत न ली होतो ही मुझे हात लगाना हा नाना पाटेकर साहेबांचा डायलॉग आपल्यावर कुठेच लागू होणार नाही.
भारतीय संविधानच्या अनुच्छेद 19 नुसार माझ्या या वरील अभिव्यक्त विचारामुळे कुण्या व्यक्तिच्या मनाला हे शब्द लागले असेल तर *आम्ही व आमची पत्रकारिता त्यातली नाहीच* अशे सिद्ध करनेसाठी पत्रकार व पत्रकारितेला *गुलाम व टाकलेली हड्डी खानारा चौकातील लावारिस कुत्रा* समजणाऱ्या या लोकांना धड़ा शिकविन्यासाठी घराच्या बाहेर निघुन रस्त्यावर या आणि यांना जाब विचारा. आणि आपली रियल पावर आणि असली ओळख दाखवा.....
शेखऱ कोलते - पत्रकार व उपसंपादक
0 टिप्पण्या