🌟गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर्स कारखान्या विरोधातील खासदारांच्या मोर्चाने वेधले जिल्ह्याचे लक्ष....!


🌟खासदार संजय जाधव यांचा आ.गुट्टेंवर हल्लाबोल : आमदार गुट्टे यांच्या राजीनाम्याची केली मागणी🌟


परभणी (दि.११ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीच्या 'गंगाखेड शुगर्स एनर्जी' प्रकल्पाच्या विरोधात परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आज सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी गंगाखेडात आयोजित केलेल्या मोर्चाने आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते यावेळी बोलतांना खासदार जाधव म्हणाले की आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी 'गंगाखेड शुगर्स एनर्जी' प्रकल्पाच्या   माध्यमातून हजारो शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज उचललून शेतकऱ्यांची फसवणूक केली आ.गुट्टे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील घाणेरडे राजकारण व फसवणूकीचे प्रकार तातडीने थांबवावे व फसवणूकीबद्दल राजीनामा द्यावा अशी मागणी देखील शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय जाधव यांनी समारोपीय भाषणातून केली.

परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,अतिवृष्टीचे अनुदान व पीकविमा मंजूर करावा, शेतकर्यांना किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा करावा तसेच वीज कनेक्शन तोडू नये व गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पातील घोटाळ्या प्रकरणातील बाधित शेतकर्‍यांचे पैसे त्वरीत वितरीत करावेत, या मागणीसाठी शिवेसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी गंगाखेडात शिवसेने (उबाठा) गटाचा मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

      गंगाखेड शहरातील बालाजी मंदिर, जूने मराठा मंदिर, भगवती चौक, श्रीराम चौक, अदालत रोड व उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. त्या ठिकाणी तालुका प्रशासनास शिवसेनेच्या शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन सादर केले. त्याद्वारे, गुट्टेंविरोधात कठोर कारवाईसह अन्य मागण्या करण्यात आल्या.

          तत्पूर्वी मोर्चेकर्‍यांनी संपूर्ण बाजारपेठेत गुट्टेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या समारोपाप्रसंगी खासदार जाधव यांनी जाहीर सभेतून गुट्टेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. एक शेतकरी कर्जबाजारी दाखवा, राजीनामा देतो, असे छातीठोकपणे दावा करणार्‍या गुट्टे यांनी खरोखरच राजीनामा द्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली. आज अनेक शेतकर्‍यांना न्यायालयाच्या नोटीसा आल्या आहेत. त्यांचे बँकेतील के्रडीट खल्लास झाले आहे, असे असतांनासुध्दा गुट्टे हे काहीही न घडल्याचा अविर्भाव आणत आहेत, तो चुकीचा आहे, असे स्पष्ट करीत जाधव यांनी गुट्टे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची फसवणूक केली अनेक प्रकरणांमधून अनेकांना अडचणीत आणले. गुट्टे यांनी हे प्रकार थांबविले पाहिजेत, ते एक जबाबदार जोकप्रतिनिधी आहेत, याची जाणीव ठेवली पाहिजे असे नमूद करीत खासदार जाधव यांनी गुट्टे यांनी दादागिरीची भाषा करु नये, त्यांना त्याच भाषेत आम्हालाही उत्तर देता येईल असा इशारा दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या