🌟वेगळ्या विदर्भासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू : ॲड. गुणरत्न सदावर्ते

 


🌟वाशीम शहरातील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली🌟

फुलचंद भगत

वाशीम : स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. त्यासाठी अनेकांनी अनेकवेळा लढा दिला आहे परंतु सध्या देशात व राज्यात भाजप सत्तेवर असल्याने विदर्भ स्वतंत्र होण्यास मदत मिळेल. त्यासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू असे प्रतिपादन ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केले. 

                     वाशीम शहरातील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ॲड. जयश्री पाटील, महेंद्र साबळे यांच्यासह विदर्भ वादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ व्हावा, यासाठी अनेकांनी लढा दिला. मात्र विदर्भाला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे विरोध करतात. परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची आशा आहे. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही. तोपर्यंत स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करून सर्वच नोकऱ्यात विदर्भातील तरुणांना प्राधान्य द्यावे. वेगळा विदर्भ होण्यासाठी री ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट आयोग स्थापन करावा. स्वतंत्र विदर्भ करण्यासाठी लोक तांत्रिक मार्गाने आपण लढा देणार असल्याचेही सदावर्ते म्हणाले.एस टी महा मंडळातील भ्रष्टाचार शोधून काढून. गोर गरीब कष्टकरी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तर स्वस्थ बसणार नाही, असे ही सदावर्ते म्हणाले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या