🌟प्रकरणातील आरोपींनी महिलेचा शारीरिक मानसिक छळ करीत गळा आवळून केला होता निर्घृण खुन🌟
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आरोपी अब्दुल रहेमान गुलाम रहेमन,आरेफ गुलाम अहेमद व झतर यांनी फिर्यादी महंमद खलील महंमद शिकुर यांची मुलगी व आरोपी अब्दुल रहेमान याची पत्नी सलमा हिला शारिरीक व मानसिक त्रास देउन पैशाची मागणी करून सलमा हिचा गळा दाबुन ख़ुन केला होता. त्यावरून पोलिस स्टेशन हट्टा येथे गृुरनं. २७९/२०१८ कलम ४९८ (अ),३०२,३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक आर.आर.धुन्ने यांनी कसोशीने पुर्ण करून सबळ पुरावे हस्तगत करीत गुन्ह्यातील आरोपी यांचे विरुध्द मा.अप्पर सत्र न्यायालय वसमत यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सद्नंतर आरोपी अब्दुल रहेमान गुलाम रहेमान,आरेफ गुलाम अहेमद यांचे विरूध्द मा.अप्पर सत्र न्यायालय, वसमत येथे खटला चालुन ज्यामध्ये सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील श्री.दासरे व श्री. नायक यांनी ससकार पक्षातर्फे योग्य युक्तीवाद केला. आरेपी अदुल रहेमान गुलाम रहेमान,आरेफ गुलाम अहेमद यांनी खुनाचा गुन्हा केल्याचे सिध्द झाल्यामुळे त्यांना मा.श्री.जयंत बी.राजे अतिरिक्त सत्र न्यायाधीश, न्या.क्र.०१ वसमत नगर यांनी दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी दोषी ठरवून आरोपीस जन्मठेप आणि ०५,०००/- दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर केस सुनावणीच्या दरम्यान मा.पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीघर साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील मेडम व मा.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.संदिपान शेलके साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या विशेष सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार यांना पो.नि.सी.ए.कदम,पोह/३५३ बेटकर,पोशि/ ९५८ पतंगे यांनी योग्य मार्गदर्शन करून काम पाहीले....
0 टिप्पण्या