🌟पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांचा कौतुकास्पद उपक्रम🌟
पुर्णा (दि.२२ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी उपद्रव करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहावे याकरिता पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी घरातील बंद अवस्थेत असलेल्या २१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना पुन्हा जिवनदान दिले असून सीसीटीव्ही कॅमेर यांच्या कॅमेर्यांचा उद्घाटन सोहळा आज शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी पुर्णा पोलीस स्थानकात ११-०० वाजेच्या सुमारास गंगाखेड उपविभागाचे विभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे पुर्णा पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी सांगितले.
पुर्णा शहरातील विविध भागात असलेले तब्बल २१ सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा शहरासह तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच उपद्रवकारी समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे अत्यावश्यक असल्याने पोलीस निरीक्षक श्री काकडे यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी विभागीय अधिकारी जीवराज दापकर उपविभाग गंगाखेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ व पुर्णा पोलीस पोलीस प्रशासनाच्या संयुक्तिक प्रयत्नांनी शहरातील विविध भागांतील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे व कौतुकास्पद पाऊल पो.नि.काकडे यांनी उचलले पुर्णा वासियांच्या सुरक्षेसह सार्वजनिक सन महोत्सवांसह सुरू असलेल्या गणेश महोत्सव काळात गणपती मंडळ आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांवर कडक नजर ठेवून पुर्णा शहराची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टींने पोलीस प्रशासनाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होत असून या २१ सीसीटीव्ही कमेऱ्यांचे उदघाटन (लोकार्पण) आज शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११-०० वाजता उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांचे हस्ते पोलीस स्टेशन पुर्णा येथील स्क्रिन द्वारे करण्यात येणार आहे.....
0 टिप्पण्या