🌟पुर्णा तालुक्यातील माटेगावात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती : गावातील जवळपास सत्तर टक्के ग्रामस्थ पाण्यापासून वंचित...!


🌟माटेगावातील पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत  ९४ लाख १४ हजार ३०० रुपयांचा निधी मंजुर🌟

🌟जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात :  कामाला कासवगती अन् दर्जाहीन कामाची निती🌟


पुर्णा (दि.२३ सप्टेंबर) - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंधारणासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जल जीवन अभियान सुरू करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारचा ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शुध्द हेतू होता परंतु 'हर घर नल...हर घर जल' या घोषणेनुसार १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन अभियान सुरू केले जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडण्या बसवण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पंचायत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती मार्फत तालुका पातळीवर जलजिवन मिशन अंतर्गत रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतरही अनेक गावांमध्ये अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या कामांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे परंतु शासनाचे या जलजीवन मिशन योजनेवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने अनियंत्रित झालेल्या जलजीवन मिशन योजनेचा अक्षरशा बट्ट्याबोळ होताना दिसत आहे.

पुर्णा तालुक्यातील ग्रामीण ग्रामीण भागात देखील कोट्यावधी रुपयांचा निधी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्राप्त झाला असतानाही अनेक गावांमध्ये जुन्याच पाईप लाईनला नवीन दाखवून तर काही भागांमध्ये जुन्याच जलकुंभांचे नूतनीकरण करून जल  जीवन मिशन योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांची अपरातफर होत असतानाही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न अद्यापही मिटलेला नसल्याचे दिसत आहे त्यात काहीसा प्रकार पूर्णा तालुक्यातील माटेगावात झाला असून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ९४ लाख १४ हजार ३०० रुपयांच्या मंजुर झालेल्या शासकीय निधीतून कामाला मंजुरी मिळूनही जुनी पाईपलाईन फोडून व रस्ते खोदण्यात आल्याने गावामध्ये ग्रामस्थांना अडचणीला काळ झाल्याचे दिसत आहे. 

माटेगावातील ग्रामपंचायत प्रशासनाने तत्पूर्वी गावात चालू असलेली भारतीय जन योजनेची पाईपलाईन जेसीबी द्वारे खोदून बाहेर काढल्या गेली यामुळे या अगोदर गावात एक-दोन दिवस आड करुन जे काही पाणी येत होते ते पण गावाच्या काही भागात ते सुद्धा सलग पंधरा दिवस बंद झाले त्यानंतर ग्रामपंचायतने मोडकी तोडकी पर्यायी व्यवस्था करूनही गावाच्या बहुतांश जवळपास ७० टक्के भागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही यामुळे शालेय मुली मुली महिला यांना पाण्यासाठी  पायपीट करावी लागत आहे  त्यात ऐन सणासुदीच्या काळ गणपती उत्सव महालक्ष्मी सण गावातील सप्ताह चालू आहे याशिवाय गावात पाण्याचा आणि कोणताही स्तोत्र नाही यासाठी येथील शेकडो गावकऱ्यांनी पूर्ण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या आणि जलजीवन अंतर्गत होत असलेल्या कामाला गती देऊन निवेदेत नमूद केल्याप्रमाणे काम करून गावच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत निवेदनावर  ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई पुरी सुनीता बोबडे  ज्योती बोबडे यांच्यासह लक्ष्मणराव बोबडे मा.सरपंच माधव सातपुते कोंडीबा दुकानदार दशरथ बोबडे संभाजी बोबडे राधेश्याम लिंगायत उत्तम बुवा विद्वांस बबन लिंगायत बाबुराव पिसाळ ऋषिकांत बोबडे गोविंद बोबडे आदिंसह शेकडो गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या