🌟सेलू तालुक्यात सरासरी सर्वाधिक तर सोनपेठमध्ये सर्वात कमी पाऊस🌟
परभणी (दि.३० सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, महिन्याभरातील पावसाच्या सरासरीची नोंद १८३.६ मिलीमीटर राहिली आहे.
सप्टेंबर महिन्यात सेलू तालुक्यात सरासरी (२३१) सर्वाधिक पाऊस पडला असून, त्यानंतर पालम (२२६.९), पाथरी (१९१), मानवत (१८७), पुर्णा (१८२.१), जिंतूर (१७९.४), परभणी (१५९.१), गंगाखेड (१५८.७) आणि सोनपेठ तालुक्यात सरासरी सर्वात कमी पाऊस (१४४) पडल्याची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सप्टेंबर महिन्यात सरासरी १९९.९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. विभागातील सरासरी पावसाच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात कमी पाऊस (१८३.६ मि.मी.) पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
---------------------------------------------------------------------
🌟परभणी जिल्ह्यात २४ तासात सरासरी १२.४ मि.मी. पाऊस : छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरी १५.९ पावसाची नोंद
परभणी (दि.३० सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १२.४ मिलीमीटर पाऊस पडला असून, पुर्णा तालुक्यात सर्वाधिक (३२.८ मिमी) पाऊस झाला आहे. याशिवाय गंगाखेड (२२.१), मानवत(१३.६), सेलू (१३), परभणी (१०.१) पालम (६.३), जिंतूर (५.८), सोनपेठ (५.३) आणि पाथरी तालुक्यात सर्वात कमी (०.३मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता, गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही जास्त असून, परभणी जिल्ह्यात कमी (१२.४ मिमी) पाऊस पडला आहे. तर विभागातील पावसाची सरासरी ही १५.९ मिमी राहिली आहे....
*****
0 टिप्पण्या