🌟मंगरुळपीर तालुक्यातील मसोला खुर्द येथील वळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून मदत द्या....!


🌟मसोला खुर्द येथिल शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन🌟


फुलचंद भगत

वाशिम (दि.२२ सप्टेंबर २०२३) :- मंगरुळपिर तालुक्यातील मसोला खुर्द येथील भाग १ मधील सर्व कास्तकार यांनी तहसीलदार यांना सोयाबीन पिकाचे अवलोकन करून मदत मिळण्यासाठी निवेदन दिले आहे.  निवेदनात म्हटले आहे की पहिल्यांदा पाणी आल्यामुळे पाणी मग न आल्यामुळे आज रोजी आमच्या शेतातील सोयाबीनचे काही पीक पिवळे व काही हिरवे असे झाले असून, सोयाबीन चे पिकांचा अंदाज कमी प्रमानात येण्याचे संकेत दिसत आहे. आता नंतर च्या पावसामुळे जमिनीतील काही भागतील पिकाला तडन बसल्या मुळे आम्हा कास्तकारांना दुष्काळाशी सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  आमच्या पिकाचे पाहनी करून, आम्हाला मदत घ्यावी अशी मागणी केली आहे.संजय राऊत यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कांतिलाल चुनीलाल चव्हाण, प्रेम रतन राठोड, काशीराम प्रताप राठोड, विनोद नारयण गिरी, सतीश पुंडलिक खड़से आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या