🌟परभणी जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करा....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन🌟


परभणी (दि.१२ सप्टेंबर २०२३) :  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या तंबाखू सेवनामुळे होणारे असाध्य रोगांबाबत आणि मौखिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात आली.उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास अधिकारी विशाल जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. यास्मिन शेख, प्रभारी शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गोविंद मोरे, यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, समिती सदस्य, स्वयंसेवक उपस्थित होते. 

त्रैमासिक आढावा बैठक केवळ कागदोपत्री न राहता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. त्यासोबतच परभणी जिल्हा धूर मुक्त करण्यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी समिती स्थापन करून नागरिकांना, युवकांना माहिती द्या. सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांच्यासह सर्वांनी तंबाखू सेवन न करण्याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. या समाजजागृतीच्या कार्यामध्ये ‌सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या