🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात विवीध उपक्रमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा....!


🌟याप्रसंगी शासनाच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमही साजरा🌟


पुर्णा (दि.१७ सप्टेंबर २०२३) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात विविध उपक्रमांने मराठवाडा  मुक्तीदिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठवाडा मुक्तीदिना निमित्त राष्ट्रीय ध्वजाचे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


याप्रसंगी शासनाच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर  मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी ग्रंथपाल डॉ. विलास काळे, डॉ. दीपमाला पाटोदे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, डॉ. प्रभाकर कीर्तनकार, प्रा. सुजाता घन यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या