🌟परभणी जिल्ह्यातील पालम मध्ये अंतरवली लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारीपेठ बंद...!


🌟सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला मिळाला 100 % प्रतिसाद🌟

परभणी (दि.02 सप्टेंबर 2023) - परभणी जिल्ह्यातील पालम शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज शनिवार दि.02 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला 100 % प्रतिसाद मिळाला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यात समाज बांधवांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलकावर दबाव आणला होता. यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर लाठीचार्ज व गोळीबार केला आहे. यात आंदोलन करते  गंभीर जखमी झाले.  या घटनेचा निषेध करण्यासाठी पालम शहरात सकाळी सात वाजल्यापासून बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नवा मोंढा, मुख्य चौक, शनिवार बाजार,फळा फरकंडा रस्ता बाजारपेठ, बस स्थानक बाजारपेठ, तहसील समोर बाजारपेठ यासह शहरातील सर्वच बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या