🌟परभणीतील खानापूर,खानापूर फाटा परिसरातील सतत होत असलेली अघोषीत लोडशेडींग बंद करा....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा🌟

परभणी (दि.११ सप्टेंबर २०२३) - परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील ३३ के व्ही अंतर्गत असलेल्या पिंगळी फिडर वरील खानापूर गाव, खानापूर फाटा व आजूबाजूच्या परिसरातील विदयुत पुरवठा सतत बंद होत असल्याने परिसरातील नागरीक त्रस्त आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी देवूनही कुठलीही कार्यवाही होत नाही त्यामुळे या परिसरांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.


रात्री अपरात्री होणारी ही अघोषीत लोडशेडींग बाबत विचारणा केली असता संबंधीत एम.आय.डी.सी. ३३ के व्ही वरील अधिका-यांकडून सतत दुरूस्तीचे कारण पुढे केले जाते. मुळात अनेक वर्षापासून या परिसरातील रोहित्र व विद्युत साहित्यांची दुरुस्ती न झाल्याने सतत फ्यूज जाण्याचा विद्युत तारा तुटण्याच्या प्रकार चालू असतो. हा एक प्रकारे महावितरणने सामान्य नागरीकांवर थोपविलेली अघोषीत लोडशेडींगच आहे. वीज बिल वसुली साठी आग्रही असलेले महावितरण सेवा देण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

खानापूर गाव, खानापूर फाटा व परिसरातील विद्युत पुरवठा व्यवस्थेची तात्काळ दुरूस्ती करून परिसरातील अघोषीत लोडशेडींग तात्काळ बंद करून विज पुरवठा अखंडीत सुरू करावा या मागणीचे निवेदन आज महवितानाच्या अधीक्षक अभियंता यांना दिले. अधीक्षक अभियंता आज सुट्टीवर असल्याने कार्यालयीन अधीक्षकांनी स्वीकारले.

बाबत आपण तात्काळ निर्णय न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व खानापूर, खानापूर फाटा व परिसरातील नागरीकांच्या वतीने महावितरण कार्यालया विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व आंदोलनावेळी उद्दभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थे बाबत महावितरण स्वतः जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई,रामेश्वर पुरी,श्रीधर वालेकर,अनिल जाधव,कृष्णाभाऊ शिंदे,सलीम सय्यद,वैजनाथ चव्हाण,अनिल शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या