🪯नांदेड येथून आज दि.१८ सप्टेंबर रोजी श्री गंगानगर सुपर फास्ट एक्सप्रेसने पवित्र हेमकुंड साहीब यात्रेसाठी भाविकांचा जत्था रवाना🪯
हुजूर साहीब नांदेड (दि.१८ सप्टेंबर २०२३) - हुजूर साहीब नांदेड येथील बाबा फत्तेसिंहजी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष स.मनबीरसिंग ग्रंथीं यांच्यासह भाविकांचा जत्था आज सोमवार दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी श्री गंगानगर सुपर फास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीने पवित्र तिर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहीब यांच्या दर्शनासाठी श्री हेमकुंड साहीब तिर्थ यात्रेला रवाना झाले असून श्री हेमकुंड साहीब येथे समस्त सिख समाजासह समस्त मानवजातीच्या सुख समृद्धीसह राज्य शासनाने सचखंड श्री हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डावर लादलेले कलम ११ रद्द करण्याची सद्बुध्दी महाराष्ट्र शासनाला द्यावी याकरिता अरदास (प्रार्थना) करणार आहेत.
या तिर्थयात्रेतील भाविकांच्या जत्थ्यात सरदार मनबीर सिंग ग्रंथी,सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे मा.सदस्य सरदार जगबीरसिंग उर्फ बबलू भाई शाहू,सरदार जगजितसिंग कुल्फीवाले यांच्यासह अन्य भाविक असून यावेळी तख्त साहेबांचे माननीय जमादार व समाजसेवक सरदार महेंद्रसिंग पादचारी व इतर लोक उपस्थित होते.....
0 टिप्पण्या