🌟मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून शालेय प्रभातफेरीला हिरवा झेंडा....!


🌟मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम संपन्न : शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती🌟 


परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून शहरातील विविध शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ झाला. 

  अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप विभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार संदीप राजपुरे, श्रीराम बेंडे, अमित घाडगे, सुरेश घोळवे, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी (नियोजन) संजय ससाणे, क्रीडा अधिकारी शैलेश गौतम यांच्यासह अधिकारी –कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. 

यावेळी शहरातील गांधी विद्यालय, पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, जिजाऊ आयटीआय, बाल विद्या मंदिर हायस्कूल, जिजाऊ ज्ञानतीर्थ आयटीआय, नूतन विद्या मंदिर, मराठवाडा हायस्कूल, परभणी जिल्हा गतका असोसिएशन, बाल विद्या मंदिर, नानलपेठ, रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद कन्या प्रशाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी शालेय शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. 

  या प्रभातफेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चिरायु होवो, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. या शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी राजोपालचारी उद्यानात पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ज्ञानसाधना बॅण्ड पथकाचा जोश पाहून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांनी पथकासोबत वाद्य वाजवून साथसंगत दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही तेच वाद्य बराच वेळ वाजवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर पुन्हा श्रीमती खांडेकर यांनी इतर वाद्य वाजवत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांना साथ दिली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाद्ये वाजविल्याने विद्यार्थ्याचा आनंद व उत्साह द्विगुणित झाला.  

 यावेळी पोलीस पथकाकडून उद्या रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. 

जिल्हा प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे..... 

*****

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या