🌟परभणी जिल्ह्यातील नोकरदार महिलांच्या ‘सखी निवास’ साठी २० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे🌟 

परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यातील नोकरी करणा-या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यासाठी १ सखी निवास मंजूर आहे. त्यामुळे भाडेतत्वावरील इमारतीमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार पात्र संस्था, एजन्सीधारकांनी २० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे. 

  नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर निवासासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि सामर्थ्य या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सामर्थ्य या उपयोजनेत नोकरी करणा-या महिलांसाठी सखी निवास या घटक योजनेचा समावेश आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात एक सखी निवास कार्यान्वीत करायचे आहे. त्यामुळे संबंधितांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या  १४ जुलै २०२२च्या मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्रस्ताव सादर करावयाचा अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पद्धत, संस्था किंवा एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोईसुविधा, अनुदान आणि कर्मचारी वर्ग शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे http//www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परभणी जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत सखी निवास योजना कार्यान्वीत करून ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणा-या सूचनेनुसार ही योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था, एजन्सीकडून बुधवार, (दि. २०) रोजी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, हनुमान मंदिराच्या पाठीमागे, शिवरामनगर, परभणी (०२४५२-२२१६२६) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

  *****


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या