🌟कंत्राटी पध्दतीने भरतीस एकजूटीने विरोध गरजेचा.....!


🌟डॉ.सिध्दार्थ भालेराव यांचे मत : डॉ.सिध्दार्थ भालेराव यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण

गंगाखेड, प्रतिनिधी

गंगाखेड (दि.२४ सप्टेंबर) - कुठल्याही शासकीय पदांची भरती कंत्राटी तत्वावर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे आरक्षणावरचा तो मोठा घावच आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव यांनी व्यक्त केले.

दि.२३ सप्टेंबर वार शनिवार रोजी दुपारी १ वाजता तालुक्यातील सांगळेवाडीत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या शाखा स्थापनेच्या  कार्यक्रम प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चिंतामणी साळवे, लातूर जिल्हा कोषाध्यक्ष पद्माकर कांबळे, डॉ. आंबेडकर सूतगिरणीचे जेष्ठ संचालक वैजनाथराव हति रोहिदास भालेराव, विश्‍वानंद साळवे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना भालेराव म्हणाले की, सध्या आरक्षण उठवण्याचा सरकारचा कुटील डाव असून आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक घटकाने आरक्षणाच्या बचावासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे. कंत्राटी पद्धतीने होऊ घातलेली पदभरती हा आरक्षण उठविण्याचाच कुटील डाव हाणून पाडण्यासाठी एकदिलाने लढाई लढण्याचे आवाहन यावेळी  भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन पक्ष पक्षाचे सांगळेवाडी शाखा अध्यक्ष जळबाजी वाघमारे, उपाध्यक्ष अशोक मलगे, सचिव शंकर तेरवर, सदस्य पांडुरंग मलगे, मारुती वाघमारे, दत्तराव तेलवर, देवबा मलगे,  विश्‍वनाथ मलगे, दत्ता मलगे, बालाजी तेलवर, ज्ञानेश्‍वर मलगे, भुजंग मलगे, दत्तराव मलगे, ज्ञानोबा मलगे,  रघुनाथ वाघमारे, राजेभाऊ वाघमारे, प्रकाश मलगे, संग्राम मलगे, रघुनाथ वाघमारे, बाबुराव शिंदे रामभाऊ खुळखुळे,धनराज गोरे,नवनाथ मुलगे,बालाजी वाघमारे,यांच्यासह परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या