🌟परभणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा आदेश अद्यापही गुलदस्त्यात ?🌟
परभणी/पुर्णा (विशेष वृत्त - ०९ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातील नियोजित उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या निर्धारीत नुतन इमारतीच्या बांधकामासाठी शहरातील शासकीय गायरान जमिनीतील जागा तात्काळ उपलब्ध करुन देण्या संदर्भात परभणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय यांना आदेश दिले होते या आदेशानुसार शहरातील शासकीय गायरान जमीन असलेल्या सर्वे नंबर १४ या शासकीय गायरान जमीनीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु महसुल प्रशासन व उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अकार्यक्षम व निष्क्रिय अधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशावर कुठल्याही प्रकारची तत्परता न दाखवता केवळ शोध मोहीम नाट्य रंगवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची तब्बल दहा महिन्यांच्या कालावधी नंतर देखील अंमलबजावणी न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या भुखंडावर बोगस कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर कब्जे केलेल्यांशी आपले आर्थिक हितसंबंध जोपासले की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा शहरात स.नं.१५८ एकून ३९.३० हेक्टर आर जमीन ७/१२ प्रमाणे आहे त्यापैकी काही जमीन शासकीय कार्यालयांना प्रदान करण्यात आली आहे तसेच मौ.पुर्णा येथिल शासकीय सर्वे नंबर १४ च्या ७/१२ वर एकून क्षेत्र १९.१४ हेक्टर आर आहे यामध्ये काही जमीनीवर बोगस कागदपत्रांच्या आधारे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन काही जमीनीवर पक्की बांधकामांसह अतिक्रमण करण्यात आली आहे.याच सर्वे नंबर १४ या शासकीय गायरान जमिनीवर जमीनीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्यात यावे असे आदेश जा.क्र.२०२१/आरबी/डेस्क/एलएनडी१/कावी-४१२ जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी नमूद अधिकाऱ्यांना दिले होते परंतु या आदेशाला संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली की काय असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या या आदेशाची नुतन तहसिलदार बोथीकर अंमलबजावणी करून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देतील काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे......
0 टिप्पण्या