🌟पुर्णेत श्रीगणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणा निमित्त उद्या दि.१२ सप्टेंबर रोजी शांतता बैठकीचे आयोजन...!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी आज नियोजन सभागृहात आढावा घेतला🌟

पुर्णा (दि.११ सप्टेंबर २०२३) - पुर्णा पोलिस प्रशासनाच्या वतीने उद्या मंगळवार दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास श्रीगणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पुर्णा नगर परिषदेच्या राष्ट्रमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस शांतता समिती सदस्य,पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच,नगरसेवक,पत्रकार,जेष्ठ नागरिक,गणेश मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली असून सदर बैठकीस माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गावडे तसेच पोलीस निरीक्षक प्रदिपजी काकडे,तहसीलदार श्री.बोथीकर पुर्णा हे आवर्जून उपस्थित राहणार असून शांतता समिती सदस्य,पोलीस पाटील,सरपंच उपसरपंच,नगरसेवक,पत्रकार,जेष्ठ नागरिक,गणेश मंडळ पदाधिकारी यांनी वेळेवर न चुकता सदर बैठकीस हजर राहावे असे आवाहन पोलीस प्रशासना तर्फे पो.नि.प्रदिपजी काकडे यांच्याकडून करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या