🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची यादी प्रसिद्ध विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले🌟

परभणी (दि.१५ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची यादी सूचनाफलकावर प्रसिद्ध केली असून, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची त्रुटीपूर्तता करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे. 

या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात प्राप्त झालेल्या एकूण १ हजार ४६१ नवीन अर्जांच्या छाननी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे तसेच अर्जातील माहितीच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात ४६६ विद्यार्थी पात्र, २७४ विद्यार्थी अपात्र झाले आहेत. उर्वरीत ७२१ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत निघालेले आहेत. या पात्र, अपात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.....

                                                            *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या