🌟जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड रोडवरील पिंपळा भत्ता येथे जोरदार रस्तारोको आंदोलन...!


🌟अ.भा.छावा मराठा संघटना व सकल मराठा समाच्या वतीने करण्यात आले जोरदार रास्तारोको आंदोलन🌟परभणी/पुर्णा (दि.०४ सप्टेंबर २०२३) - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिला पुरुषांवर लाठी हल्ला करण्यात आला शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसह माता-भगिनींवर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड मार्गावरील पिंपळा भत्ता येथे सकल मराठा समाज व अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


यावेळी अखिल भारतीय छावा मराठा संघनेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तता युवा नेते गजानन सवराते म्हणाले की मराठा समाजाने आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी जितकी आंदोलन केली ती सर्व आंदोलन संवेधानिक मार्गाने व शांततेत केली जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे येथील उपोषण देखील शांततेत होत असतांना महाराष्ट्रातील शासनाच्या आदेशाने अत्याचारी पोलिस प्रशासनाने उपोषणकर्त्यांसह आमच्या माता भगिनीवर अमानुषपणे लाठीहल्ला तर केलाच गोळीबार देखील केला यापुढे अशी घटना झाल्यास आजवर परभणी जिल्हा शांत होता परंतु यापुढे राहणार नाही असा इशारा देखील यावेळी गजानन सवराते यांनी दिला यावेळी सकल मराठा समाज बांधवांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनास उपस्थित होता......  


   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या