🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील वरिष्ठ अभियंता लाचखोर एम.शिवय्या सिबीआयच्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्या...!

 


🌟वाहनाचे थकीत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची केली होती मागणी🌟

नांदेड/परभणी : दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अभियंता एम.शिवय्या या अधिकाने वाहनाचे थकीत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती या संदर्भात तक्रारदाराने केलेल्या तक्रारी नंतर संबंधित लाचखोर वरिष्ठ अभियंता एम.शिवय्या पाच हजाराची लाच स्वीकारताना सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने नुकतीच अटक केली प्रथमतः सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने पुर्णा जंक्शन येथील एका रेल्वे अधिकाऱ्याचा शोध घेतल्याने संबंधित अधिकाऱ्याला याची कुणकूण लागल्यामुळे त्याने पलायन केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

नांदेड,औरंगाबाद,पुणे रेल्वे विभागात तक्रारदाराने आपले पिकअप वाहन उपलब्ध केले होते. या वाहनासाठी महिन्याला प्रत्येकी वाहनाला ४७ हजार ९९९ भाडे रेल्वे विभागाकडून दिले जाणार होते. मात्र मागील दोन वर्षापासून तक्रारदाराला वाहनाच्या भाड्याची रक्कम मिळाली नव्हती. भाड्याचे थकलेले जवळपास ३४ लाख ५५ हजार ९२८ रुपये बिल झाले होते. थकीत बिल मिळवण्यासाठी तक्रारदाराने इलेट्रिकल विभागातील वरिष्ठ अभियंता एम.शिवय्या यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी एम.शिवय्या यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. 

मागणी केलेल्या रक्कमेत पाच हजार हजार रुपये अगोदर घेतले होते. उर्वरित पाच हजार रकमेसाठी तगादा लावला जातं होता. त्यामुळे तक्रारदाराने ७ सप्टेबरला पुणे येथील सीबीआयच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने सोमवारी सापळा रचला आणि कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची उर्वरित रक्कम घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. पूर्णा येथील अधिकाऱ्यावर देखील या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. दरम्यान मंगळवारी अधिकाऱ्याला नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने अधिकाऱ्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या